जिल्हा
अंबरनाथला शिवसेनेचा भगवाच फडकणार
अंबरनाथला शिवसेनेचा भगवाच फडकणार
फोटो: ठाणे वैभव
ज्योती वाघमारे यांचा दावा
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असा दावा शिवसेनेच्या समन्वयक प्रचारक प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केला.
अंबरनाथच्या विकासाचा नवा अध्याय शिवसेनाच लिहिणार असून अंबरनाथ नगरपरिषदेवर पुन्हा शिवसेनेचाच झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केवळ शिवसेनेच्या माध्यमातून शहरात विकास कामे झाल्याचा दावा केला.
अंबरनाथमध्ये 1995 पासून शिवसेनेचे प्राबल्य आहे, राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शहरात विकास कामे करताना मोठ्या प्रमाणावर निधी दिला, त्यामुळे पालिका इमारत, धर्मवीर आनंद दिघे नाट्यमन्दिर, स्पर्धा प्रशिक्षण केंद्र, शिवमंदिर परिसर सुशोभिकरण यांसारख्या महत्वाच्या कामांना गती मिळाल्याचे शहरप्रमुख वाळेकर यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनीही शहरात झालेल्या विकास कामांबाबत माहिती दिली. आमदार राजेश मोरे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, स्वप्ना गायकवाड, शीतल पवार, ॲड. निखिल वाळेकर, रवींद्र करंजुले, शीतल बागुल, प्रभाग रूपाली गेजगे, राजेंद्र वाळेकर आदी उमेदवारांसह हजारो नागरिक उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600