जिल्हा

२६९७ ठिकाणी श्रीमूर्तींची होणार प्राणप्रतिष्ठापना

२६९७ ठिकाणी श्रीमूर्तींची होणार प्राणप्रतिष्ठापना
२६९७ ठिकाणी श्रीमूर्तींची होणार प्राणप्रतिष्ठापना फोटो: ठाणे वैभव
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात माघी गणेशोत्सवाची धूम ठाणे: माघी गणेशोत्सवाची संख्या दरवर्षी वाढत असून ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत तब्बल २६९७ गणपती बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत. त्याकरिता चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून ठाणे महापालिकेने पर्यावरण पूरक विसर्जन व्यवस्था केली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक १६१ ठिकाणी गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे तर २५३६ घरगुती गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पोलिस आयुक्तालय परिसरातील दीड दिवसाचे ४० तर घरगुती १७०९ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. पाच दिवसांचे सार्वजनिक ७५ आणि घरगुती ६५९ गणरायाचे आगमन होणार आहे. सहा दिवसांचे सार्वजनिक दोन तर घरगुती दहा गणपती बसवले जाणार आहेत. ११२ घरगुती आणि २८ सार्वजनिक गणरायाची प्राण प्रतिष्ठापना सात दिवसांची केली जाणार आहे. दहा दिवसांच्या गणरायाचे आगमन सार्वजनिक आठ ठिकाणी आणि घरगुती ४६ ठिकाणी केले जाणार असून अकरा दिवसाचा गणपती एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या गणेशोत्सव दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता कायदा सुव्यवस्था चोख ठेवली जाणार असून ठाणे महापालिकेने देखील पर्यावरण पूरक विसर्जन व्यवस्था केली असून कृत्रिम तलावाची निर्मिती केली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600