महाराष्ट्र

सिकंदरने छोटा गनीला आधी अस्मान दाखवले, मग लोळवले

खासदार क्रीडा संग्रामात रंगला कुस्तीचा डाव डोंबिवली : सुप्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू सिकंदर शेख आणि दिल्लीतील पंजाब केसरी छोटा गणीसोबत या स्पर्धेतील पहिला आणि प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. ज्यामध्ये अवघ्या आठ मिनिटांत महाराष्ट्राच्या सिकंदरने छोटा गनीला लोळवत अस्मान दाखवले. आणि प्रेक्षणीय सामन्यात विजयी सलामी दिली. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रिडा संग्राम स्पर्धेचा रविवारी प्रारंभ झाला. शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे या स्पर्धेचा अत्यंत साधेपणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीचेही मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघासह डोंबिवली शहराच्या संतश्रेष्ठ ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात या स्पर्धा होत आहेत. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध रॅपर मिटोराईड छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शौर्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू सिकंदर शेख आणि दिल्लीतील पंजाब केसरी छोटा गणीसोबत या स्पर्धेतील पहिला आणि प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. ज्यामध्ये अवघ्या 8 मिनिटांत महाराष्ट्राच्या सिकंदरने छोटा गनीला लोळवत अस्मान दाखवले. आणि प्रेक्षणीय सामन्यात विजयी सलामी दिली. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राची कुस्तीपटू उपमहाराष्ट्र केसरी वैष्णवी पाटील आणि शिवांजली शिंदे यांच्यामध्ये महिलांचा सामना खेळवला गेला. ज्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळच्या वैष्णवीनेही साताऱ्याच्या शिवांजलीला काही मिनिटांतच लोळविले आणि विजयी पताका फडकवली. दरम्यान कुस्तीच्या सामन्यानंतर यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत कबड्डी, खोखो आदी स्पर्धांनाही यावेळी प्रारंभ करण्यात आला. खासदार क्रिडा संग्रामात एकूण १६ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी ११ क्रिडा स्पर्धा डोंबिवलीतील ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात खेळवल्या जाणार आहेत. यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, विधानसभा महिला संघटक लता पाटील, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब - जिमनॅस्टिक, चेस, रायफल शूटिंग, खो-खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल कॅरम, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, रेसलिंग, टग ऑफ वर या खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे. मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, पलावा स्टेडियम, स्काय प्लाझा डोम हॉल उल्हासनगर, अंबरनाथ रायफल अँड पिस्टोल शूटिंग रेंज याठीकाणी होणार आहेत. तर दिवा, कळवा, डोंबिवली पुर्व पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या आठ ठिकाणी बॉक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600