जिल्हा

सहा कंपन्यांनी एका आठवड्यात कमावले ६३ हजार कोटी

गुंतवणूकदारांची दिवाळी! मुंबई: गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला असला, तरी सेन्सेक्समधील पहिल्या १० पैकी ६ दिग्गज कंपन्यांच्या बाजार भांडवलात ६३,४७८.४६ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रो आणि देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय यांनी बाजी मारली आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १८७.९५ अंकांनी (०.२२%) वधारला. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे मूल्यांकन २८,५२३.३१ कोटींनी वाढून ६.०२ लाख कोटींवर पोहोचले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार मूल्यात १६,०१५.१२ कोटींची भर पडली असून ते ११.२२ लाख कोटी झाले आहे. एचडीएफसी बँक बँकेचे भांडवल ९,६१७.५६ कोटींनी वाढून १४.०३ लाख कोटींवर पोहोचले. एलआयसीच्या मूल्यात ५,९७७ कोटींची, तर बजाज फायनान्सच्या मूल्यात ३,१४२ कोटींची वाढ झाली. बाजारात एका बाजूला तेजी असताना, दुसरीकडे चार मोठ्या कंपन्यांना मात्र फटका बसला आहे. भारती एअरटेल कंपनीच्या मूल्यांकनात सर्वाधिक १५,३३८.६६ कोटींची घट झाली. आयसीआयसीआय बँकेची बाजार पत १४,६३२.१० कोटींनी कमी झाली आहे. इन्फोसिस (६,७९१ कोटी घट) आणि टीसीएस (१,९८९ कोटी घट) या दिग्गज आयटी कंपन्यांच्या बाजार भांडवलातही घसरण नोंदवण्यात आली. बाजार भांडवलाच्या शर्यतीत मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज १९.२१ लाख कोटींच्या मूल्यांकनासह आजही देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून पहिल्या स्थानी कायम आहे. टॉप १० कंपन्यांचा क्रम १. रिलायन्स इंडस्ट्रीज २. एचडीएफसी बँक ३. भारती एअरटेल ४. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ५. आयसीआयसीआय बँक ६. टीसीएस (TCS) ७. बजाज फायनान्स ८. लार्सन अँड टुब्रो ९. एलआयसी (LIC) १०. इन्फोसिस

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600