जिल्हा
मनसेकडून उमेदवारांची सहावी यादी जाहीर
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या यादीत एकूण 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव, नाशिक मध्यमधून अंकुश पवार, जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे, विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर, उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी डोंबिवलीत कार्यक्रमात आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचंदेखील नाव होतं. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे होती, त्यानंतर तिसऱ्या यादीत 13, चौथ्या यादीत 5, पाचव्या यादीत 15 आणि आता सहाव्या यादीत 32 असे एकूण आतापर्यंत 110 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600