जिल्हा

स्लॅब कोसळून दाम्पत्य जखमी; सहा घरे सील

स्लॅब कोसळून दाम्पत्य जखमी; सहा घरे सील
स्लॅब कोसळून दाम्पत्य जखमी; सहा घरे सील फोटो: ठाणे वैभव
ठाणे: जुन्या धर्मा निवास या चाळीतील पहिल्या मजल्याचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळून तळ मजल्यावर राहणारे दांपत्य जखमी झाले आहे. संजय उतेकर (४०) आणि योगिता उतेकर अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी रात्री कळवा- विटाव्यातील सुर्यानगर येथे घडली असून जखमी दोघांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर तातडीने त्या चाळीतील सहा सदनिका रिकाम्या करून सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या घटनेची माहिती सहायक आयुक्त ललिता जाधव यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमी झालेल्या दोघांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आले. चाळीचे बांधकाम हे २४ ते ३० वर्षे जुने असून सूर्यकांत वाळुंज यांच्या मालकीच्या रूमचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेनंतर चाळीतील २० सदनिकांपैकी सहा सदनिका रिकाम्या करून सील करण्यात आल्या आहेत. सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित बांधकाम धोकादायक स्थितीत असून ठामपा बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600