जिल्हा

ठाणे स्थानक परिसरात लवकरच प्री-पेड रिक्षा थांबा

ठाणे स्थानक परिसरात लवकरच प्री-पेड रिक्षा थांबा
ठाणे स्थानक परिसरात लवकरच प्री-पेड रिक्षा थांबा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांसाठी होणारी प्रवाशांची गर्दी, जादा भाडे आकारण्याच्या तक्रारी आणि अपुऱ्या रिक्षांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रिक्षा चालकांच्या संस्था आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून (आरटीओ) प्री-पेड रिक्षा थांबा सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. ठाणे पश्चिमेकडील सॅटीस पूलाखाली ही सुविधा सुरू होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काही रिक्षाचालक प्रवाशांकडून इच्छितस्थळी जाण्यासाठी जादा भाड्याची मागणी करतात. प्री-पेड सुविधेमुळे प्रवासापूर्वीच भाडे निश्चित होणार असल्याने वाद आणि तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळेस स्थानक परिसरातून घरी परतणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सॅटीस पुलाखाली एक बूथ उभारला जाणार आहे. या बूथवर ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे, तेथील पत्ता सांगावा लागतो. प्री-पेड रिक्षा प्रवासासाठी अंतरानुसार प्रवासी भाडे ठरविले जात असते. प्रवासी भाडे ठरविल्यानंतर प्रवाशाला एक पावती दिली जाईल. त्यामध्ये रिक्षा चालक आणि प्रवाशाचे नाव, मोबाईल क्रमांक, रिक्षा क्रमांक असेल. बूथवर रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती असल्याने प्रवाशांनाही सुरक्षित प्रवास करता येईल. प्री-पेड रिक्षा थांब्यासाठी नियोजन सुरू आहे. रेल्वे विभागाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही आठवड्यांत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600