जिल्हा

एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध

एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध
एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध फोटो: ठाणे वैभव
शिलाई भत्त्यासाठी ठाण्यात आंदोलनाचा इशारा ठाणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कर्मचाऱ्यांना तयार गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून विरोध दर्शवला जात आहे. तयार गणवेश वाटपाचा निर्णय तत्काळ रद्द करून प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च दर्जाचे कापड आणि शिलाई भत्ता थेट बँक खात्यात जमा करण्याची मागणी महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनने केली आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलनाचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वीही काही वेळा प्रशासनाकडून तयार गणवेश थेट कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी वापरलेले कापड निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. अनेक कर्मचाऱ्यांचे गणवेश अवघ्या तीन ते चार महिन्यांत फाटल्याची उदाहरणेही समोर आली होती. त्यामुळे महामंडळाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसल्याचे सांगितले जाते. असे असताना यंदा पुन्हा तयार गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याने संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा तीच चूक महामंडळाला परवडणारी नाही, असे मत फेडरेशनने व्यक्त केले आहे. कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा पर्याय खर्चिक नसून उलट बचतीचा असल्याचा दावा संघटनेने केला आहे. सध्याचा प्रस्तावित गणवेश कामाच्या स्वरूपाशी सुसंगत नसून त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. तसेच मापात न बसणारा आणि विचित्र रचनेचे गणवेश परिधान केल्यास कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्याचा परिणाम महामंडळाच्या प्रतिमेवरही होतो असे संघटनेचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600