जिल्हा
पबजी गेमच्या वादातून मित्रावर टोकदार हत्याराने वार
भिवंडी : मोबाईलवर पबजी गेम खेळण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर टोकदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी हल्लेखोर मित्रावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी कापडी (२०) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर मित्राचे नाव आहे. तर आकाश महाजन (२०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी आकाश व सनी हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. मित्र असल्याने दोघेही मोबाईलवर पबजी गेम खेळत असताना आकाशने सनीला गेम खेळताना अश्लील शिव्यांची कमेंट केल्याने वाद झाला होता. दरम्यान ३० जुलै रोजी पुन्हा पबजी गेममध्ये शिवीगाळ केल्याचा वाद उफाळून येताच सनीने अचानक आकाशवर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करत त्याला गंभीर जखमी केले.
त्यानंतर जखमी अवस्थेत आकाशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600