जिल्हा
अंबरनाथजवळ कोयना एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक
अंबरनाथजवळ कोयना एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक
फोटो: ठाणे वैभव
सुदैवाने कोणाही प्रवाशाला इजा नाही
अंबरनाथ: कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कुणाही प्रवाशाला इजा झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोल्हापूर येथून मुंबई सीएसटीएम रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या एक्सप्रेसवर (ट्रेन नंबर ११०४२) अंबरनाथच्या बी केबिन परिसरात आज सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी, गाडी बदलापूर सोडून अंबरनाथ स्थानकातून जात असताना अंबरनाथजवळील बी केबिन रोड परिसरातून, एका अज्ञात इसमाने गाडीच्या एस-वन या डब्यावर दगडफेक केली. दगडफेक करणारा संशयित आरोपी असून, यापूर्वी देखील त्याने रेल्वेवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्याची तक्रार रेल्वेकडे प्राप्त झाली आहे. या अज्ञात इसमाचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यापूर्वी देखील संबंधित इसमाला या प्रकरणात अटक झाली आहे.
कल्याण रेल्वे पोलिस त्या इसमाचा शोध घेत आहेत, त्याला अटक केल्यावर त्याच्या सोबत या घटनेत अजून कोणी सामील होते का? याबाबत तपास केला जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600