जिल्हा

स्कुल बस चालकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग

बदलापूर: बदलापुरातील एका नामांकित शाळेच्या बसचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो आणि ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्कुल बस चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकाने बसमध्ये विनयभंग केल्याचा आरोप आहे. यानंतर पीडित विद्यार्थिनीने तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बस चालकाविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600