महाराष्ट्र
भाग्यश्री दशपुत्रेचे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश
बदलापूरः थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या इंड्युरन्स इंटरनॅशनल या स्केटींग स्पर्धेत बदलापूर येथील भाग्यश्री दशपुत्रे हिने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कास्य पदकांची कमाई केली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतातून या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, मुंबई येथून २५ खेळाडूंची निवड झाली होती. भारत, श्रीलंका, फिलिपीन्स, सौदी अरेबिया, यूएई, नेपाळ, इंडोनेशिया, इजिप्त, बांगलादेश, रवांडा, केनिया, थायलंड अशा १२ देशातील खेळाडूंचा इंड्युरन्स इंटरनॅशनल या स्पर्धेत समावेश होता.
बदलापूरच्या भाग्यश्री दशपुत्रे हिने या स्पर्धेत कॉड स्केटिंग प्रकारात एक सुवर्णपदक, एक रौप्य आणि एक कांस्यपदक प्राप्त केले. तर रिक्रिएशनल इनलाईन स्केटिंग प्रकारात एक सुवर्णपदक आणि दोन कांस्यपदक मिळवली आहेत. या सहा पदकांसह भाग्यश्री हिला पंच आणि परिक्षक स्तरावरील प्रमाणपत्रही बहाल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600