जिल्हा

शीळमध्ये मादी सोनेरी कोल्ह्याची यशस्वी सुटका

शीळमध्ये मादी सोनेरी कोल्ह्याची यशस्वी सुटका
शीळमध्ये मादी सोनेरी कोल्ह्याची यशस्वी सुटका फोटो: ठाणे वैभव
ठाणे: कल्याण-शीळ रोडवरील पडले गाव, मुक्त रेसिडेन्सी परिसरात वनविभागाने एका मादी जातीच्या सोनेरी कोल्ह्याची यशस्वीपणे सुटका केली आहे.
शीळ भागात एका वन्यप्राण्याचा वावर असल्याची माहिती शिळफाटा अग्निशमन दलाने वनविभागास कळविली होती. या माहितीची तत्काळ दखल घेत ठाणे वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने तातडीने रेस्क्यू मोहीम राबवून एका मादी सोनेरी कोल्ह्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. ही कारवाई वन परिमंडळ अधिकारी संदीप मोरे, कळवा वन परिमंडळाचे कर्मचारी वृंद आणि व्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि डीएलएडब्ल्यु संस्थेचे वन्यजीव स्वयंसेवी विशाल कंथारिया यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
सुटका करण्यात आलेली मादी अंदाजे १ ते २ वर्षे वयाची असून, ती वन्यजीव संरक्षण कायद्याच्या 'शेड्यूल १' अंतर्गत संरक्षित आहे. सध्या या वन्यप्राण्याला पुढील वैद्यकीय तपासणी व निरीक्षणासाठी वन्यजीव परागमन केंद्र (टीटीसी), डायघर येथे हलवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
वनविभागाच्या नियमांनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास तत्काळ वनविभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मुठे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600