क्राईम
डायघरमध्ये तरुणीची आत्महत्या
ठाणे: डायघर भागात नातेवाईकांच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आत्याच्या दिराने लैंगिक अत्याचार केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलगी ही मुळची बिहार येथे वास्तव्यास होते. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने तिच्या वडिलांनी तिला शिक्षणासाठी चुलत आत्याच्या घरी पाठविले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून ही मुलगी डायघर येथे राहण्यास आली होती. पंरतु गेल्याकाही दिवसांपासून तिच्या आत्याचा दीर हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत तिने तिच्या वडिलांनाही सांगितले होते. तिचे वडिल तिला घेऊन पुन्हा बिहारला नेणार होते. परंतु गुरुवारी त्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी सायंकाळी तिच्या आत्महत्येची माहिती वडिलांना मिळाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी डायघर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600