जिल्हा

नवी मुंबई महापौरपदी सुजाता पाटील बिनविरोध

नवी मुंबई महापौरपदी सुजाता पाटील बिनविरोध
नवी मुंबई महापौरपदी सुजाता पाटील बिनविरोध फोटो: ठाणे वैभव
* महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध * नवी मुंबईत प्रथमच भाजपची एकहाती सत्ता नवी मुंबई : तब्बल सहा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबईला महापौर मिळाला आहे. भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील या बिनविरोध महापौर म्हणून निवडून आल्या असून, भाजपचेच उमेदवार दशरथ भगत यांची बिनविरोध उपमहापौर म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) आपल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज ऐनवेळी माघारी घेतल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. यानिमित्ताने नवी मुंबईत पहिल्यांदाच भाजपची एकहाती प्रस्थापित केली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय लढत होण्याची शक्यता होती. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळाली, ही राजकीय चुरस महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा दिसून आली. शिवसेनेच्या वतीने दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली होती. भाजपकडे ६५ अधिक एक असे स्पष्ट बहुमत असतानाही ही लढत चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये महापौर-उपमहापौर पदासाठी चुरस रंगली असतानाच गुरूवारी झालेल्या पहिल्या महासभेच्या सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी दाखल करण्यात आलेला नामांकन अर्ज मागे घेण्यात आला, त्यामुळे भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील यांची बिनविरोध महापौर म्हणून निवड झाली. यानंतर उपमहापौर पदासाठीही शिंदे गटाने नामांकन अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपचे उमेदवार दशरथ भगत हे बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले. महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेतील भाजपची भूमिका अधिक भक्कम झाली असून, येणाऱ्या काळात नवी मुंबईच्या विकासासाठी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर कशाप्रकारे भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600