जिल्हा
सुस्मिता देशमुख आठवेळा ठरली राज्याची स्ट्राँग वूमन
सुस्मिता देशमुख आठवेळा ठरली राज्याची स्ट्राँग वूमन
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, येथे 21-22 फेब्रुवारी 2026 रोजी, महाराष्ट्र राज्य क्लासिक सीनियर, मास्टर 1, 2, 3, 4 पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडू सुस्मिता देशमुख हिने 52 किलो वजनी गटात 380 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू (स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र) हा बहुमानही पटकावला. या स्पर्धेत 200 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
सुस्मिता देशमुख हिने सलग आठ वर्षे महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकावला आहे. 31 जानेवारी 2026 रोजी श्री कृष्ण खामकर विद्यालय, येथे ठाणे जिल्हास्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक तसेच सलग नऊ वर्षे सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठाणे जिल्हा हा बहुमान मिळवला.
सुश्मिता ठाण्याच्या रीओ फिटनेस व्यायामशाळेत सराव करते. प्रशिक्षण किरण सनस आणि स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत यश मिळविले. ती यशाचे श्रेय रीओ जिम टीम, प्रशिक्षक, आई-वडील वंदना देशमुख, सुनील देशमुख यांना देते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600