जिल्हा

तळीरामाने रेल्वे स्थानकालगत जिन्यावरून चालवली रिक्षा

मिरारोडमधील मध्यरात्रीचा प्रकार भाईंदर: रविवारी रात्री १२ च्या सुमारास एका मद्यधुंद रिक्षाचालकाने रस्त्यावर नाही तर थेट रेल्वे स्थानक प्रवेशद्वारालगत असलेल्या जिन्यावरून रिक्षा चालवली मीरा रोड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री १२च्या सुमारास घडली आहे. दारूच्या नशेमध्ये रिक्षाचालकाने थेट मीरा रोड रेल्वे स्थानकावर रिक्षा (एम एच 04- जे एच-4363) घुसवली. रिक्षाचालकाने रेल्वे स्थानक प्रवेशद्वारालगत असलेल्या जिन्यावर रिक्षा चालवत दुसऱ्या बाजूने रिक्षा उतरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न फसला. रिक्षाचालक दारूच्या नशेत असल्याने त्याला रिक्षा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरून खाली उतरवणे शक्य झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. जागरूक नागरिकांनी रिक्षा चालकाला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रिक्षाचालक दारुच्या नशेमध्ये असल्यामुळे मोठी जीवितहानी घडली असती. रात्रीच्या वेळेस रेल्वे पोलीस रेल्वे स्थानक परिसरात उपस्थित नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600