जिल्हा

तहसीलदार युवराज बांगर यांचा दक्षिण आफ्रिकेत जागतिक विक्रम

तहसीलदार युवराज बांगर यांचा दक्षिण आफ्रिकेत जागतिक विक्रम
तहसीलदार युवराज बांगर यांचा दक्षिण आफ्रिकेत जागतिक विक्रम फोटो: ठाणे वैभव
काॅम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ ठाणे: तहसीलदार युवराज बांगर यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या काॅम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन 2025 स्पर्धेतील आव्हानात्मक अंतर 11तास 32 मिनिटांत पूर्ण करून जागतिक पातळीवर अल्ट्रा रनरचा नवीन विक्रम केला आहे. 8 जून 2025 रोजी झालेल्या काॅम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन 2025 या स्पर्धेचे 98 वे वर्ष होते. दक्षिण आफ्रिकेतील पिटर माॅरिटस बर्ग ते डर्बन असे स्पर्धेचे 90 किमी अंतर होते. हे अंतर 12 तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे अनिवार्य असून या स्पर्धेत पाच ठिकाणी थरारक कट ऑफ देखील आहेत. दक्षिण आफ्रिकेत 1921 पासून सुरु झालेली जगातील सर्वात जुनी आणि खडतर स्पर्धा म्हणून काॅम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातून अनेक अल्ट्रा रनर सहभागी होत असतात. या स्पर्धेत 90 किलोमीटरचा डोंगराळ, उंच सखल भागाचा समावेश असून स्पर्धेदरम्यान वातावरणीय बदल होत असतात. जगभरातून 85 देशातील 25 हजारहून अधिक अल्ट्रा रनर स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यात दक्षिण आफ्रिका पहिल्या तर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. या वर्षी भारतामधून 395 अल्ट्रा रनर सहभागी झाले होते त्यापैकी 330 स्पर्धकांनी यशस्वीरित्या नियोजित वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. युवराज बांगर महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात तहसिलदार पदावर कार्यरत आहेत. बांगर यांनी ठाण्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रशासकीय, कार्यालयीन कामकाजातून होणारा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी बांगर यांनी रनिंगचा छंद जोपासला. यातून पूढे ठाणे, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, लोणावळ्यात होणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पारितोषिके, मेडल्स पटकावले आहेत. तसेच महसुल विभागाकडून होणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धांमध्ये हिरिरीने सहभाग घेत असतात.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600