जिल्हा

रस्त्यातील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला

रस्त्यातील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला
रस्त्यातील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प ५ मधील हिललाइन पोलिस स्टेशनजवळ, रस्त्यातील खड्ड्यांमुळे एक टेम्पो उलटला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेने पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा अधोरेखित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास एका टेम्पोमधून बांबू व इतर सामान नेण्यात येत होते. हिललाइन पोलिस ठाण्यासमोर असलेल्या या मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व टेम्पो उलटला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही मात्र वाहनाचे सामान आणि वाहनाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेले नागरिक तातडीनं वाहनचालकाच्या मदतीला धावले व टेम्पोला खड्ड्यातून बाहेर काढले. उल्हासनगर शहरातील अनेक रस्त्यांची आधीच बिकट अवस्था असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यात भुयारी गटार योजनेअंतर्गत सदर रस्ता खोदण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या ढिसाळ कारभारामुळे खोदलेले रस्ते आता रहदारीच्या दृष्टीने धोकादायक होऊ लागले आहेत. त्यातही गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600