जिल्हा

दोन महिन्यांत ठामपा मालामाल

मालमत्ता करापोटी ६६ दिवसात 200 कोटींची विक्रमी वसुली ठाणे: मालमत्ता कराच्या पहिल्या तिमाहीत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या 66 दिवसात 200 कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणे महापालिकेने चालू (2023-24) आर्थिक वर्षाची देयके 1 एप्रिल 2023 रोजी तयार करुन याबाबत नागरिकांना एसएमएसद्वारे अवगत केले होते. या एसएमएसद्वारे मालमत्ता कराची देयके डाऊनलोड करणे, प्रिंट करणे तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याकरिता अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मालमत्ता कर नागरिकांना भरणे सोईचे व्हावे यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयात कर संकलन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून कार्यालयीन वेळेत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सदर केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. मालमत्ता कराची देयके प्रभाग समितीनिहाय सर्व मालमत्ता धारकांना वितरीत करण्यात असून सदर मालमत्ता देयके संबंधितांना प्राप्त झालीत की नाही याची खातरजमा करुन कर भरणेबाबत आवाहन करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यावर्षी 900 कोटी इतके वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 1000 कोटी वसुलीसाठी प्रयत्न करावा सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता कर वसुली विभागाने 200 कोटी इतकी मालमत्ता कर वसुली केली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे, मालमत्ता कराची वसुलीबाबत सातत्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून यावर्षी 1000 कोटींची वसुली करण्याचा प्रयत्न करावी अशी अपेक्षा आयुक्त अभिजीत बांगर व्यक्त केली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 7 जून 2022 रोजी 108.35 कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा 92.22 कोटी इतकी वाढीव वसुली म्हणजेच 90 टक्के इतकी आहे. या वर्षी आतापर्यत एकूण 151536 इतक्या मालमत्ताधारकांनी कर भर भरणा केलेला आहे. प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रावर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल. त्याशिवाय, ऑनलाईन कर भरणा सुविधाही कार्यरत आहे करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरून उपलब्ध करून घेऊ शकतील. या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच Google Pay PhonePe, PayTm, BHIMApp याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. प्रभाग समिती कर भरणा (कोटी रुपयांमध्ये) 2023-24 2022-23 माजीवडा-मानपाडा - 66.04 26.47 वर्तक नगर - 42.40 26.53 नौपाडा-कोपरी - 29.81 17.79 उथळसर - 16.57 9.61 लोकमान्य नगर-सावरकर नगर – 9.97 3.48 कळवा - 7.54 3.27 दिवा - 6.69 3.16 वागळे इस्टेट - 7.24 2.95 मुंब्रा - 7.16 3.87 मुख्यालय – 7.15 11.22 करभरणा - रक्कम ऑनलाईन - 85.67 कोटी धनादेश - 83.39 कोटी रोख - 22.67 कोटी डीडी - 14.20 कोटी कार्ड पेमेंट - 0.19कोटी

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600