जिल्हा

ठाण्यात आयुष मंत्रालयातर्फे प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा

ठाणे: `आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन' हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्यावतीने तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन २०२४ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. ज्योती भोजने, डॉ. राजेंद्र प्रसाद शर्मा आणि डॉ. किरण पंडित यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली. राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ, डॉ. मूस मार्ग, ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन होणार आहे. महासंमेलानाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष म्हणून पद्मश्री, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट) आणि सरबानंद सोनोवाल (केंद्रीय आयुष मंत्री), श्रीपाद नाईक (केंद्रीय मंत्री) डॉ. महेंद्र मुंजापरा (केंद्रीय आयुष राज्यमंत्री) यांच्यासह पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा (सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार), आरती अहुजा (सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, भारत सरकार), वैद्य जयंत देवपुजारी (चेअरमन, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसीन), डॉ. मनोज नेसारी (ॲडव्हायजर (आयुर्वेद) मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार) आणि वैद्य राकेश शर्मा (प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ इथिक्स अँण्ड रजिस्ट्रेशन, एनसीआयएसएम) आदी उपस्थित राहणार आहेत. तणाव नियोजन, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधीविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत. नागरिकांसाठी, कायचिकित्सा/जनरल मेडिसीन, त्वचाविकार, योग व डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून ओपीडी सुद्धा उपलब्ध असणार आहे. आयुर्वेदिक तज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे तसेच येथील मैदानात ५५ नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स असतील, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. [embed]https://www.youtube.com/watch?v=8sX6jCcbDZA&t=28s[/embed]

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600