जिल्हा

१५ डब्यांच्या लोकलसाठी ठाणे-डोंबिवली लवकरच सज्ज

१५ डब्यांच्या लोकलसाठी ठाणे-डोंबिवली लवकरच सज्ज
१५ डब्यांच्या लोकलसाठी ठाणे-डोंबिवली लवकरच सज्ज फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: डोंबिवली आणि ठाणे येथे शनिवार, रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लाॅकच्या काळात फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी एकूण ५०० कामगार आणि १४ वरिष्ठ रेल्वेचे अधिकारी मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रेल्वे मार्गात काम करत होते. अतिशय अल्पावधीत ही फलाट विस्तारीकरण आणि रूळ बदलण्याची कामे करायची असल्याने अत्याधुनिक सामग्री याठिकाणी वापरण्यात आली. डोंबिवली रेल्वे स्थानकात अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर फलाट क्रमांक एक आणि एक ए व फलाट क्रमांक दोन येथे हा मेगाब्लाॅक घेण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक, दोन आणि तीनवर हा मेगाब्लाॅक घेण्यात आला. ५०० कामगारांच्या माध्यमातून फलाट विस्तारीकरण आणि रेल्वे रूळ बदलण्याची कामे विहित वेळेत पूर्ण होतील. ही कामे पूर्ण केल्यानंतर त्यावरून तातडीने लोकल सेवा सुरू होईल अशी आव्हानात्मक कामे होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोन्ही कामांचे योग्य नियोजन करून विहित वेळेत ही कामे पूर्ण केली. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील कोपर रेल्वे स्थानक दिशेकडील डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवेश करतानाचे वळण काढणे मोठे आव्हानात्मक रेल्वे प्रशासनावर समोर होते. याठिकाणी एका बाजुला उंच १५ फूट उंचीचा माती, दगडाचा धस. त्यावर रेल्वेचे वाहनतळ. जमीन समांतर अशी एक इंचही जागा याठिकाणी नव्हती. त्यामुळे १५ फूट उंचीच्या धसावर (लहान टेकडी) खडी, जेसीबी, पोकलेन उभी करून, आवश्यक सामग्री त्या ठिकाणी आणून ते सामान रेल्वे मार्गात उतरवले जात होते. त्यानंतर ही कामे केली गेली. डोंबिवली रेल्वे स्थानकात कोपर दिशेकडून फलाट क्रमांक एकवर येताना एक दोन ते तीन फुटाचे बाकदार वळण होते. हे वळण घेताना सांधेजोड मार्ग ओलांडताना लोकलला एक ते दीड मिनिटाचा अवधी जात होता. हा मिनिटाचा कालावधी टाळण्यासाठी आणि लोकलमधील वारंवारिता खंडित होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर लोकल आणणे टाळत होते. या सर्व लोकल एक रेल्वे मार्गिकेतून कल्याण दिशेने जाव्यात म्हणून फलाट क्रमांक एक एवर आणल्या जात होत्या. मेगाब्लाॅकच्या काळात डोंबिवली रेल्वे स्थानकात महत्वाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पाॅईंट क्रमांक १२५ डब्ल्यू काढून टाकून तो सरळ करून पुन्हा बसविण्यात आला. पाच मीटर अंतराचे वळण काढून रेल्वे मार्ग अंशता सरळ करण्यात आला. नवीन टाकलेल्या १५० मीटर लांबीच्या सरळ मार्गाशी जोडलेला क्राॅस ओव्हर तत्काळ कार्यान्वित करण्यात आला. डाऊन लोकलच लाईनच्या बाजुने महत्वपू्र्ण केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. फलाटाच्या विस्तारीकरणासाठी फलाट क्रमांक एकच्या बाजुला जागा तयार करण्यात आली आणि तेथे रूळ सरकविण्याचे काम करण्यात आले. या भागात असलेले भंगार साहित्य हटविण्याचे काम यावेळी करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकात हायड्रा, जेसीबी आणि पोकलेनचा वापर करून सर्व वळणदार रेल्वे मार्ग काढून टाकण्यात आले. ६० मीटर रेल्वे मार्गाचे पुनर्स्थापन करण्यात आले. फलाट क्रमांक तीन आणि चारच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यात आली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600