जिल्हा

ठाण्याच्या सूरज पी.एच.ला राष्ट्रीय मास्टर्स विजेतेपद

ठाण्याच्या सूरज पी.एच.ला राष्ट्रीय मास्टर्स विजेतेपद
ठाण्याच्या सूरज पी.एच.ला राष्ट्रीय मास्टर्स विजेतेपद फोटो: ठाणे वैभव
ऑल इंडिया गोल्डन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा ठाणे: ठाणे बॅडमिंटन अकादमीचा खेळाडू सूरज पी.एच. यांनी ऑल इंडिया गोल्डन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये दमदार कामगिरी करत पुरुष दुहेरी ३५+ गटाचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा २४ व २५ मे रोजी मंगलोर (कर्नाटक) येथील यू.एस. मल्ल्या इंडोअर स्टेडियममध्ये पार पडली. सूरज पी.एच. हे सध्या इनकम टॅक्स विभाग, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात छत्तीसगडच्या बी.एल. थरम आणि सी.एच. गांधी यांच्यावर २१-१३, २१-१८ असा सरळ सेटमध्ये प्रभावी विजय मिळवून पदकावर आपले नाव कोरले. हा विजय केवळ एका सामन्याचा नव्हता, तर एका खेळाडूच्या सातत्य, चिकाटी आणि योग्य प्रशिक्षणाचा ठसठशीत पुरावा होता. सूरज पी.एच. हे ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी प्रशिक्षण योजनेत म्हणजेच ठाणे बॅडमिंटन अकादमी येथे नियमित सराव करतात. ही अकादमी केवळ मुलांनाच नव्हे, तर आपल्या वयाच्या गटात सर्वोच्च गाठू इच्छिणाऱ्या प्रौढ खेळाडूंनाही योग्य मार्गदर्शन देते. अशा खेळाडूंना नवे संधीचे दालन खुलं करत, त्यांना राष्ट्रीय स्तरावर झळकविण्याचे काम ही अकादमी यशस्वीपणे पार पाडत आहे. या यशामागे अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि ज्येष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, श्रीकांत भागवत, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, अमित गोडबोले, प्रसेनजीत शिरोडकर आणि एकेंद्र दर्जी यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरले. या सर्व प्रशिक्षकांनी कठोर परिश्रम घेत, सूरज यांना तांत्रिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600