जिल्हा

ठाणेवैभव क्रिकेट करंडक : आज 'क' गट अंतिम फेरी

ठाणे : ३ मार्च २०२५ रोजी ४९ व्या ठाणेवैभव करंडक वासंतिक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेस स्पोर्टिंग क्लबच्या सेंट्रल मैदानावर प्रारंभ झाला. आज दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मालवण कट्टा वि.बिनेट कम्युनिकेशन्स अशी 'क' गटातील अंतिम फेरी रंगणार आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक प्रल्हाद नाखवा यांनी दिली. अप्लाइड क्लाऊड, टीम वर्क स्पोर्टस मॅनेजमेंट व विहंग एन्टरप्रायझेस संघांचा पराभव करून मालवण कट्टा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. असाच पराक्रम करून बिनेट कम्युनिकेशन्सने जनरल इन्शुरन्स कं. मटेरीयल ऑर्गनायझेशन व वेस्टर्न रेल्वे ट्रॅफिक संघावर मात करून अंतिम फेरी गाठली आहे. अप्लाइड क्लाउड, टीम वर्क स्पोर्टस मॅनेजमेंट, जनरल इन्शुरन्स कं, व वेस्टर्न रेल्वे ट्रॅफीक हे चार संघ स्पर्धेत प्रथमच सहभागी झाले आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600