जिल्हा

नागरिकांच्या सतर्कतेमुळे लहान बालकाचे अपहरण टळले

आरोपी पोलिसांच्या ताब्यात कल्याण: कल्याण पश्चिमेतील मुस्लिमबहुल भागात स्थानिकांच्या सतर्कतेमुळे एका बालकाचे अपहरण करणाऱ्या युवकाला रंगेहात पकडण्यात आले. आरोपी युवक अडीच वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना काही लोकांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. लोकांनी मुलाला घेऊन चालणाऱ्या आरोपीला आवाज देऊन हटकले असता आरोपीने मुलाला मागे सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रस्त्याने जाणाऱ्यांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्या आरोपी युवकास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कोळीवाडा येथील हयात कॉम्प्लेक्सजवळील एका घरात एक महिला स्वयंपाक करत होती. त्यावेळी तिचा अडीच वर्षांचा मुलगा दारात उभा होता. अचानक करण कट्टीमणी नावाचा एक युवक आला आणि मुलाला खांद्यावर घेऊन जाऊ लागला. अचानक तिथे उपस्थित असलेल्या लोकांना करण कट्टीमणी संशयास्पद पद्धतीने मुलाला घेऊन जाताना दिसला. लोकांना त्याच्यावर संशय आल्याने त्याचे नाव विचारले असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तो फक्त म्हणाला, 'मला सोडा, मला जाऊ द्या.' तो मूल चोरण्याच्या उद्देशाने आला आहे याची लोकांना खात्री पटल्यावर त्यांनी त्याला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवक करण कट्टीमणी हा सोलापूरचा रहिवासी आहे. त्याच्या खिशातून सोलापूर-दादर ट्रेनचे तिकीट सापडले आहे. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्या संदर्भात पोलीस अधिकारी सुरेशसिंग गौड अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600