ठाणे
गोदामांच्या भस्मासुराने गिळल्या भिवंडीतील गायरान जमिनी
गोदामांच्या भस्मासुराने गिळल्या भिवंडीतील गायरान जमिनी
फोटो: ठाणे वैभव
तहसीलदारांच्या चौकशी अहवालात उघड
ठा णे : दि व्यातील शीळ भागात एक हजारहून अधिक अनधिकृ त गोदामांवर कारवाईची मोहीम ठाणे महापालि के ने हाती घेतली असतानाच भि वंडीतील गायरान जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून हजारो गोदामे उभी राहिल्याची बाब तहसि लदारांच्या चौकशी अहवालातून उघडकीस आली आहे.
भि वंड ी त ा लुक्यात ी ल मानकोली, गुंदवली, दापोडे, वालशिंद आणि धामणगाव या गावांमधील शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृ त बांधकामे झाली असून, 'नवीन शर् ती'चा भंग करून जमिनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विध ानसभेच्या उपाध्यक्षां च्या निर्देश ानंतर भि वंडी तहसीलदार कार्या लयाने ठाणे जि ल्हाध िकार् यांना एक सवि स्तर चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात शासकीय भुखंडासह गायरान जमिनीही गोदामांनी गि ळल्याचे नमूद करण्यात आले आहेत.
लॉजि स्टिक हब म्हणून ओळखल्या जाणार् या भि वंडीतील हजारो गोदामांवर कारवाई होण्याची शक्यता निर्मा ण झाली आहे. याप्रकरणी सामाजि क कार्यकर्ते संदेश कोकाट े यांनी विध ानसभेच्या उपाध्यक्षां कडे भि वंडीतील शासकीय जमिनी बळकावल्याप्रकरणी एक तक्रा र निवेदन सादर के ले होते. निवेदनात भि वंडी तालुक्यातील काही शासकीय व गायरान जमिनींवर अनधिकृ तरीत्या लॉजि स्टिक पार्क, गोदामे आणि औद्योगि क प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप के ला होता. या तक्रा रीची गंभीर दखल घेत उपाध्यक्षां च्या दालनातून चौकशीचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार तहसीलदार कार्या लयाने मंडल अधिकारी व महसूल यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून सवि स्तर अहवाल तयार केला आहे. अहवालातील धक्कादायक खुलाशांनुसार मानकोली येथील स.नं. ९४/० ही जमीन मूळची 'खाजण' स्वरूपाची असून, त्यावर अनधिकृत बांधकाम उभे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुंदवली येथील स.नं. ७/० ही जमीन 'महाराष्ट्र शासन / गुरुचरण' (गायरान) म्हणून नोंद आहे. येथील जागेवरही बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे समोर आले असून, यापूर्वीही याबाबत जिल्हाधि कार् यांकडे अहवाल पाठवण्यात आला होता. वालशि ंद येथील स.नं. २/० ही ३.९१.० हेक्टर क्षेत्र असलेली 'खराबा' जमीन असून, येथेही परिस्थिती गंभीर आहे. धामणगाव येथील स.नं. १००/० व १६०/० ही सरकारी पडीत आणि गुरुचरण जमिनींवरही वाणिज्यिक कारणांसाठी बेकायदेशीरपणे वापर सुरू असल्याचा संशय आहे.
भिवंडी तहसीलदारांनी संकलि त के लेला हा संपूर्ण फे रफारनिहाय वंशावळ आणि चौकशी अहवाल अं ति म निर ्णयासाठी ठाणे जिल्हाधि कार् यांच्या महसूल शाखेकडे सुपूर्द केला आहे. आता या प्रकरणी जिल्हाधि कारी दोषींवर काय कारवाई करतात आणि ही अनधि कृ त बांधकामे कधी जमीनदोस्त के ली जातात, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600