जिल्हा

कार तलावात घुसली; दाम्पत्य बचावले

कार तलावात घुसली; दाम्पत्य बचावले
कार तलावात घुसली; दाम्पत्य बचावले फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : शेजारील उंबार्ली गावातील तलावात चारचाकी वाहन बुडता बुडता वाचले. अंदाज चुकल्याने हे वाहन तलावात गेले असले तरी वाहनातील पती-पत्नी वेळेवर बाहेर पडल्याने बचावले, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कानबाने यांनी दिली. ही घटना बुधवारी 22 तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस व शिवसैनिक मदतीला धावले. संबंधित दाम्पत्य येथील देवळात दर्शन घेऊन परत घरी जाण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनात बसले. गाडी चालू करताना अंदाज चुकल्याने गाडी थेट तलावात गेली. वेळीच पती-पत्नी चारचाकी वाहनातून बाहेर पडले. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना व पोलिसांना दिली. याची माहिती शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिक मदतीला धावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलाला उंबार्ली तलावाजवळ बोलावले. स्थानिक नागरिक, शिवसैनिक, पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तलावातील चारचाकी वाहन बाहेर काढण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600