जिल्हा

रखडलेल्या कामांमुळे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर संतापले

ठाण्यात विकास कामांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलखोल ठाणे : किती दिवस झाले कामे पूर्ण का होत नाहीत, कालावधी देऊन सुद्धा काम पूर्ण होत नाहीत, कोणीही असो त्यांच्यावर कारवाई करा, पैसे पाहिजे तर माझ्याकडून घ्या, नगर विकास खाते सक्षम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. यामध्ये नाल्यांची पाहणी करण्यासोबतच त्यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याला पोखरण रोड नं २ या ठिकाणावरून सुरुवात झाल्यानंतर पोखरण रोड नं २ च्या रखडलेल्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. कार्यादेश देऊनही रस्त्यांचे काम वेळेत न झाल्याने मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले. केवळ ठाणे महापालिका क्षेत्रात १३४ किमीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आयआयटीला देखील रस्त्यांचे सॅम्पल पाठवले जातील. रस्त्यांच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट देखील केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्त्यावर खड्डा पडल्यास एका खड्ड्याला एक लाख दंड वसूल करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र खड्डा पडेल अशी वेळच अधिकाऱ्यांनी आणू नये असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये. ज्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. जे अधिकारी चांगले काम करतील, ज्यांच्या परिसरात समस्या निर्माण होणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल. मात्र नागरिकांना त्रास झाला तर कारवाई निश्चित केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. रस्त्यांसोबत सुशोभीकरणाची कामे देखील युद्धपातळीवर सुरु आहेत . याचे चांगले परिणाम शहरात दिसून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोना काळात महापालिकांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ६०० कोटी दिले आहेत. या निधीमधून शहरात चांगली कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले. रिक्त जागा भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्यामुळे ७५ हजार जागांची भरती करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नालेसफाई दौऱ्याच्या आधीच भीमनगर येतील नाल्यात पोकलेनचा अपघात झाल्याचा प्रकार समोर आला. नालेसफाई सुरू असतानाच पोकलेन नाल्यात रुतून पलटला. त्यामुळे ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचे ठिकाण बदलले. महापालिका अधिकाऱ्यांनी भीमनगर नाल्याच्या ठिकाणावरून यावेळी काढता पाय घेतला. तर दुसऱ्या एका नाल्यात सफाईसाठी उतरलेल्या जेसीबीचा टायर पंक्चर झाल्याने नालेसफाई करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा प्रकार याचवेळी उघड झाला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600