जिल्हा

पोस्टमॉर्टम नको म्हणून बाळाच्या बॉडीसह बाप पसार

Thanevaibhav Online 16 September 2023 ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकार ठाणे : खोकल्याच्या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झालेल्या बाळाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नको, म्हणून आपल्या आठ महिन्याच्या मुलाचा मृतदेह घेऊन पिता पसार झाल्याची घटना ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली. या घटनेमुळे कळवा रुग्णालयातील गलथान कारभाराचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात गुरुवारी रात्री आठ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते. त्यावेळी निमोनियाचे देखील लक्षणे होती. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगताच मुलाच्या वडिलांनी शवविच्छेदनाला विरोध केला आणि आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन पसार झाले. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालयाकडून तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ-डायघर येथून या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एका आठ महिन्याच्या बाळाला भर रुग्णालयातून घेऊन जात असताना रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वी याच पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना आता या घटनेमुळे कळवा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600