मनोरंजन

लाघवी इंदूची लोभसवाणी गोष्ट

अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…  अवघ्या महाराष्ट्राला सध्या एक कोडं पडलंय .. कोण आहे इंदू??? इंदू आहे एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ पण तितकीच विचारी मुलगी. वय लहान पण बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना पहिल्या प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल नि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. म्हणून या इंदूच्या भेटीसाठी रसिकांना उत्कंठा लागून राहिलीय.  अवघा महाराष्ट्र जिची आतुरतेने वाट पहातोय, ती  “ इंद्रायणी “ महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठीवर अवतरणार २५ मार्चपासून सायं ७ वा. कलेचा, संगीताचा, नि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेचीही तितकीच मोठी परंपरा आहे. याच संत परंपरेने महाराष्ट्राला तत्वज्ञानाची, विचारांची  एक  बैठक घालून दिलीय. याच वैचारिक संप्रदायाच्या संस्कारात वाढत जाणारी आहे, ही इंद्रायणी.  तिच्या हुशारीची, तिच्या लाघवी  स्वभावाची भुरळ  रसिकांना पडली नाही तरच नवल. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराला नि घरातल्या प्रत्येकाला जोडणारी ही ‘ इंद्रायणी’  लवकरच छोट्या पडद्यावर अवतरेल पण तत्पूर्वीच ‘ इंद्रायणी’ मालिकेच्या प्रत्येक प्रोमोने रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवलीय. कारण यात इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ “ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. ‘जीव झाला येडापिसा’ , ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे निर्माते निखिल शेठ त्यांच्या पोतडी एंटरटेनमेंट द्रारा या मालिकेची निर्मिती करत असून याच मालिकांचे प्रसिध्द दिग्दर्शक विनोद लव्हेकर ‘इंद्रायणी’ चे दिग्दर्शन करत आहेत. नक्की पहा, ‘इंद्रायणी’ २५ मार्चपासून संध्याकाळी ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600