जिल्हा

छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी लढणारा एकमेव आमदार

* आशीष शेलारांकडून स्तुतीसुमने * आ.संजय केळकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन ठाणे: छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी लढणारा एकमेव आमदार म्हणजे ठाण्याचे संजय केळकर आहेत. एखाद्याच्या कल्पनेतही येणार नाहीत किंबहुना प्रश्नाला हात घालायला दहावेळा विचार करतील, असे प्रश्न आ. केळकर आग्रहाने आणि आक्रमकतेने विधीमंडळात मांडतात. अशी स्तुती भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी संजय केळकर यांची केली. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या "आपला माणुस, हक्काचा माणूस " या कार्यअहवालाचे प्रकाशन सोमवारी ठाण्यात भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. शेलार बोलत होते. संजय केळकर या संगीतमय ऑडिओचे अनावरणही आ. शेलार यांनी केले. याप्रसंगी, शिवसेना खा. नरेश म्हस्के, आ.निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी उपमहापौर सुभाष काळे, रिपाइंचे भास्कर वाघमारे आदीसह अनेक माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. आ. शेलार पुढे म्हणाले, पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून १० वर्षे विधीमंडळात आ. केळकर यांची कारकिर्द जवळून पाहिली. कधीही आक्रस्ताळेपणा नाही, स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक, स्पष्ट विचारांचा कार्यकर्ता आणि संवेदनशील मनाचा विकासपुरुष अशा आ. संजय केळकर यांनी, अकृषिक कर रद्द , टोलमाफी यासह शिक्षणापासून ते मोकळ्या जागा, बगिचे, कोपरी पुल व ऐतिहासिक रेल्वे इंजिनापर्यंत अनेक प्रश्न धसास लावले. एखादा दहा वेळा विचार करेल असे प्रश्नही त्यांनी विधीमंडळात मांडले. किंबहुना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांसाठी सतत लढणारा एकमेव आमदार म्हणजे संजय केळकर असल्याचे आ. शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600