महाराष्ट्र
ठाकरे बंधू आणि महायुतीची गर्जना शिवाजी पार्कवरुन
ठाकरे बंधू आणि महायुतीची गर्जना शिवाजी पार्कवरुन
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून यंदा ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे अशी थेट लढत होत आहे. त्यासाठी, दोन्ही युतीच्या पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणूक होत असून सर्वच पालिका क्षेत्रात सध्या सभांचा, प्रचार रॅलींचा हंगाम पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी सभांचा धडाका लावला आहे.
शिवसेना ठाकरे गट, मनसे, शिंदेंची शिवसेना आणि भाजप या चार पक्षांनी शिवाजी पार्क मैदान 11, 12 जानेवारीला सांगता सभेसाठी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेला पत्र दिलं होतं.
मुंबई महापालिकेने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला 11 जानेवारी रोजी परवानगी दिली आहे, 11 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता संयुक्त सभा होणार आहे. तर 12 जानेवारीला भाजप आणि शिवसेनेची मुंबईतील भव्य संयुक्त सभा शिवाजी पार्कवर होईल.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.