महाराष्ट्र

वाशीत इमारतीचा स्लॅब कोसळला

नवी मुंबई : वाशी सेक्टर २९ भूखंड क्रमांक ४९ सुदामा सोसायटीमधील इमारतीतील दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी घडली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील काही दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्याचा स्लॅब खाली पहिल्या मजल्यावर पडला. स्लॅब ज्या हॉलमध्ये पडला त्यावेळी सुदैवाने कोणी हजर नसल्याने कोणी जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. तीन महिन्यापूर्वी या इमारतीचे संरचना परीक्षण केले असून इमारत सुस्थितीत असल्याचा अहवाल आला आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तूर्तास ही इमारत रिकामी केली असून यातील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था राजस्थान हॉलमध्ये केली आहे. या इमारतीचे पुन्हा परीक्षण केल्यानंतर या रहिवाशांना इमारतीत राहण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नवी मुंबई महानगर पालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600