जिल्हा

तिसरे ऑपरेशन टायगर ठाण्यातून झेपावणार

तिसरे ऑपरेशन टायगर ठाण्यातून झेपावणार
तिसरे ऑपरेशन टायगर ठाण्यातून झेपावणार फोटो: ठाणे वैभव
या अधिवेशनातच ठाकरे गटाचे १४ आमदार फुटणार
ठाणे: खासदार फोडण्याचे ऑपरेशन टायगर २ यशस्वी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आता आमदारांना गळाला लावण्याचे ऑपरेशन टायगर ३ सुरु केले आहे. या ऑपरेशनची संपूर्ण तयारी आणि नियंत्रण ठाण्यातून होणार आहे. या अधिवेशनातच ठाकरे गटाचे १४ आमदार फोडण्याची खेळी खेळली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवण्यात येत असून त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. १४ फुटीर आमदारांना कोणत्या ठिकाणी ठेवायचे त्यांची बडदास्त कशी ठेवायची याची संपूर्ण तयारी सध्या शिंदे गटाकडून अतिशय काळजीपूर्वक आणि गुप्तपणे केली जात आहे. ठाकरे गट न्यायालयात गेले तरी फुटीर आमदारांवर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही, अशा पद्धतीने तांत्रिक बाजू भक्कम करण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच हा डाव टाकला जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले.
मागिल आठवड्यात फुटीर गटातील आमदार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन गेले होते, त्यामुळे ऑपरेशनची तयारी पूर्ण झाली असल्याचे बोलले जात आहे. फुटीर आमदारांना काही दिवसांसा अज्ञात ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या विश्वासू शिलेदारावर सोपविण्यात आली आहे. उद्या सोमवारपासून ८ जुलैपर्यंत हे ऑपरेशन पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची ताकद केंद्रात आणि राज्यात देखिल वाढणार आहे. त्याचे बक्षीस म्हणून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची बढती होऊन त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल, असा विश्वास त्यांच्या खास शिलेदारांना आहे.
*मागिल आठवड्यात खासदार फोडण्यासाठी आणि त्या बाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासा आवश्यक कागदपत्रे ठाण्यात तयार करण्यात आली होती. खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र देखिल ठाण्यातच तयार करण्यात आले होते. तशीच प्रक्रिया ठाण्यात होत असल्याने हे ऑपरेशन देखिल यशस्वी होईल, असा विश्वास शिंदे समर्थकाना वाटत आहे.*

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600