जिल्हा

अपघातात जखमी तरुणाला रुग्णालयात नेऊन तत्काळ उपचार

अपघातात जखमी तरुणाला रुग्णालयात नेऊन तत्काळ उपचार
अपघातात जखमी तरुणाला रुग्णालयात नेऊन तत्काळ उपचार फोटो: ठाणे वैभव
रस्त्याने जाणाऱ्या आमदार सुलभा गायकवाड यांचे प्रसंगावधान कल्याण : कल्याण पूर्वेतील काटेमानवली विजयनगर परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन चाकी टेम्पोला दुचाकीने दिलेल्या धडकेच्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दरम्यान तेथून जात असलेल्या कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी थांबून अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकास आपल्या गाडीत घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने तातडीने रूग्णालयात पाठवले. कल्याण पूर्वेतील संतोषीमाता मंदिर काटेमानवली विजयनगर रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन चाकी टेम्पोला दुचाकीने धडक दिल्याच्या घटनेत दुचाकीचालक छोटू उर्फ विनोद चव्हाण या 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या निखिल कर्पे हा 22 वर्षांचा युवक गंभीर जखमी झाला. याचवेळी आमदार सुलभा गायकवाड तिकडून जात होत्या. त्यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निखिल यांस आपल्या गाडीत बसवून खाजगी रूग्णालयात पाठविले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600