जिल्हा

बदलापूरमध्ये होणार नाट्यगृह

नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची माहिती बदलापूर: बदलापूर येथे सुसज्ज नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिली. बदलापूरमधील नाट्यगृहाच्या निर्मितीबाबत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रशांत दामले यांच्याशी ठाणे येथे नुकतीच सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनचे व्यवस्थापक भारत गाडेगावकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे उपस्थित होते. बदलापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशांत दामले यांनी दिले. या याप्रसंगी प्रशांत दामले आणि भारत गाडेगावकर यांनी गडकरी रंगायतनमध्ये स्टेज, मेकअप आर्टिस्ट रूम, कलाकारांच्या रिहर्सल रूम, लाईट व साऊंड सिस्टम, कलाकारांच्या राहण्याच्या खोल्या अशा सर्व व्यवस्था दाखवल्या आणि या सर्व गोष्टींबाबत सखोल चर्चा केली. नाट्यगृह चालवण्यासाठी लागणारे सर्व बारकावे समजावून सांगितले. भारतीय जनता पार्टी कोकण विभाग आयटी सेलचे संयोजक मिलिंद धारवाडकर, निवेदक भूषण करंदीकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600