महाराष्ट्र

ठाणे शहरातील काही भागात आज पाणी नाही

ठाणे : आनंदनगर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बाधित होत असून त्याचे स्थलांतर करण्यकामी शटडाऊन करण्यात येत आहे, त्यामुळे उद्यापासून २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आनंदनगर येथील चिल्ड्रन ट्रफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूलपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामांतर्गत 450 मिमी व 300 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बाधित होत आहेत. त्या स्थलांतरीत करण्याचे काम आवश्यक आहे. या जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम उद्या मंगळवार 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद ठेवण्यात आला आहे. या शटडाऊन कालावधीत घोडबंदर रोड आनंदनगर येथील कासारवडवली गाव (काही भाग), एव्हरेस्ट वर्ल्ड संकुल, यशराज पार्क संकुल, होरायझन हाईट संकुल, क्रिष्णा ग्रीन लँड पार्क संकुल, विजयपार्क संकुल, राम मंदिर रोड परिसरातील गृहसंकुले, भवानीनगर व ट्रॉफिक पार्क जलकुंभारवरील उन्नती वुड संकुल, ट्रॉपीकल लगुन संकुल, विजय विलास संकुल, वाघबीळ जुना गाव, स्वस्त‍िक रेसीडेन्सी संकुल, हिल स्प्रिंग संकुल, सर्व्हिस रोड ते कासारवडवली नाका सर्व्हिस रोड लगतचा परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600