जिल्हा

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम.बी.आर. येथे मुख्य जलवाहिनीस गळती होत असून गळती बंद करण्यासाठी कामे हाती घेण्यात येणार आहेत. परिणामी बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मानकोली येथील कामाबरोबरच स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी बुधवार ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन सदरची कामे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा १२ तासाचा शटडाऊन घेऊन तातडीची कामे हाती घेणार आहे. परिणामी बुधवार ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवाचा काही भाग इत्यादी भागात १२ तासांसाठी पुर्णपणे पाणी पुरवठा बंद राहील. पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600