महाराष्ट्र

उद्या ठाण्यात पाणी नाही

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत्‍ बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600