जिल्हा
स्कायवॉकवर चोरट्यांचा भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
कल्याण: कल्याणातील स्कायवॉकवर दोन अज्ञात चोरट्यांनी भाजी विक्रेत्यावर दगडाचा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचे पैसे, मोबाईल लुटून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.
कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी दगडाचा हल्ला करीत भाजी विक्रेता सुरेश सिंग यांस गंभीर जखमी करून त्याच्या खिशातून सहा हजार रुपये आणि मोबाईल चोरी करून पोबारा केला.
या हल्ल्यात सुरेश सिंह गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात चोरट्या आरोपीचा शोध सुरू केला असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून मिळाली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600