जिल्हा

घोडबंदरला तिसरे नाट्यगृह

ठाणे: राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा दोन नाट्यगृहांबरोबरच आता नवीन तिसरे नाट्यगृह घोडबंदर परिसरात उभारण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी १३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वेगाने वाढत असणाऱ्या घोडबंदर परिसरात नवीन नाट्यगृह उभारण्यात यावे अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून रसिक नाट्यप्रेमीकडून वारंवार करण्यात येत होती. याच मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने वाघबीळ येथील सुविधा भूखंडावर नाट्यगृह उभारणीची घोषणा केली. या महत्वाकांक्षी प्रकल्पांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून या नवीन नाट्यगृहाचा भूमिपूजन सोहळा लवकरच करण्यात येणार आहे. गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे दोन्ही नाट्यगृह घोडबंदरपासून बरेच लांब असल्याने आनंदनगर, कासारवडवली, वाघबीळ, ओवळा, भाईंदर पाडा तसेच कावेसर या भागातील नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी या भागात नवीन तिसरे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून हे नाट्यगृह सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वाचे ठरणार असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. नवीन नाट्यगृह सुमारे ७ हजार ३०० चौ.मी. सुविधा भूखंडावर उभारण्यात येणार असून जवळपास दोन हजार आसन व्यवस्था क्षमतेचे नाट्यगृह असणार आहे. हे नाट्यगृह आधुनिक सुविधांनी सज्ज असेल तसेच दोन मल्टिपर्पज हॉल देखील उभारण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600