जिल्हा
पॅलेस्टाईनमध्ये पैसे पाठविणाऱ्या तिघांना भिवंडीत अटक
उत्तर प्रदेश एटीएसची छापेमारी
ठाणे: उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी उशिरापर्यंत छापेमारी करत भिवंडीतील विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे तीन लाख रुपये गोळा करून ती रक्कम पॅलेस्टाईन देशात पाठवल्याचा आरोप आहे. या तिघांवर संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२) रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी, अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (२२) रा. गुलजार नगर, भिवंडी जैद नोटियार अब्दुल कादिर (२२) रा. वेताळ पाडा, भिवंडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखाची रक्कम पॅलेस्टाईन देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर शुक्रवारी भिवंडीत दाखल झालेल्या यूपी एटीएसच्या एका पथकाने तपास सरू केला. दिवसभर या तरुणांवर पाळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमारास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकान अचानक छापेमारी केली. यावेळी पथकाने अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याले इतर दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर या दोघांची नावे सांगितली. पथकाने दोघांनीही शांतीनगर आणि निज्मापुरा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर रक्कम गोळा करून दहशतवाद्यांना पाठविल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.
शनिवारी, रात्री उशिरा या तिन्ही तरुणांना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरामधून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून आफताबचे घर शोधून काढण्यात आले. त्याला अटक करून दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात आले. आता, त्या पाठोपाठ भिवंडीतील या तिघांवर देशविघातक संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
दोन वर्षापूर्वी नवरात्री आणि दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी देशविघातक आणि दहशतवादी कृत्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना भिवंडी शहरातून ताब्यात घेण्यात आले. ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले होते. तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून आयसीसीच्या आठ ते दहा दहशतवाद्यांना काही महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
एकंदरीतच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दहशतवाद्यांसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासह देश विघातक कारवाईचे कनेक्शन उघड झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब धोक्याची असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600