जिल्हा

कसाऱ्यात भीषण अपघातात तिघे ठार

कसाऱ्यात भीषण अपघातात तिघे ठार
कसाऱ्यात भीषण अपघातात तिघे ठार फोटो: ठाणे वैभव
कसारा: मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा हद्दीतील ऑरेंज हॉटेलसमोर एका कारचा अपघात होऊन प्रथम एकजण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झाल्याने उर्वरित दोघेही मृत्यू पावले. मंगळवारी रात्री 10 वाजता होंडा कंपनीची क्रेटा कार (एमएच ०४- केडब्ल्यू ४४२५) चालकाने निष्काळजी आणि बेदरकारपणे चालविल्याने उतारावरील वळणावर एका खडकावर जोरदार आदळून पलटी झाली. या कारचा अक्षरशः चुराडा झाला. तत्पूर्वी चालकाने बाहेर उडी घेत पळ काढला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कारमध्ये बसलेले तिघे जण अनुक्रमे रियाज हैसीयत अली, आसादुल्लाह आणि अफजल (हे तिघेही राहणार उत्तरप्रदेश) हे तरुण मृत्यू पावले आहेत. या प्रकरणी अधिक तपास कसारा पोलीस निरिक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक राकेश कदम करीत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600