महाराष्ट्र

जलशुद्धीकरण केंद्रात वीजेच्या धक्क्याने तीन कामगार दगावले

अंबरनाथच्या जांभूळमधील घटना अंबरनाथ : बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या जलशुद्धी केंद्रामध्ये जमिनीत पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून तीन कामगार दगावले असून अन्य दोन कामगार जखमी झाले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आज गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ठेकेदाराने कामात दुर्लक्षपणा केल्यामुळे तीन कामगारांना जीव गमवावा लागला आहे. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक पाण्याचा पंप बंद पडल्याने सहा कामगार बंद पडलेला पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. पंप बंद असला तरी पंपाला असलेला विजेचा पुरवठा सुरूच ठेवल्याने या पंपाला शॉक लागून बिहार राज्यातील शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८) आणि राजन मंडल(१९) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600