जिल्हा
तीन कामगारांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर
तीन कामगारांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर
फोटो: ठाणे वैभव
तारापूर एमआयडीसीत वायुगळती
पालघर: बोईसर-तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमुळे आठ कामगारांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान जखमी कामगारांवर बोईसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांना जीव गमवावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृतांची नावे आहेत तर रोहन शिंदे आणि निलेश हाडळ हे जखमी आहेत.
गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान बोईसर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर 13 ता. जिल्हा पालघर येथील मेडली फार्मा या कंपनीत नायट्रोजन रिएक्शन टॅंकमध्ये गॅस गळती झाल्याने अपघात घडला. त्यात सहा व्यक्ती बाधित झाल्या. त्यांना शिंदे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यातील चार व्यक्ती मृत झाल्या आहेत. तर दोघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहे
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600