जिल्हा
टीजेएसबी सहकारी बँकेचा २५ हजार कोटींचा टप्पा पार
देशातील चौथ्या क्रमांकाच्या सहकारी बँकेचे स्थान अधिक मजबूत
ठाणे: देशातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बैंक लिमिटेडने २५ हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या यशामुळे बँकेच्या चौफेर विस्ताराच्या प्रवासाला आणि आर्थिक स्थैर्याला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे.
सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने सहकारी क्षेत्रातील विश्वसनीय वित्तीय संस्था म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या बँकेचे सात राज्यांमध्ये १६५ शाखांचे विस्तृत जाळे असून, रिटेल, एमएसएमई आणि कॉर्पोरेट ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करत बैंक ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा पुरवत आहे.
२५ हजार कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा बँकेने सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवांना दिलेले प्राधान्य यामुळे गाठला आहे.
बँकेच्या विस्ताराच्या वाटचालीत अध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासोबतच संचालक मंडळ आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या दिशादर्शनामुळे बँकेची प्रगती अधिक वेगाने सुलभ झाली आहे.
२५ हजार कोटींच्या या उल्लेखनीय टप्प्यानंतर बँक भौगोलिक विस्तार वाढविणे, डिजिटल सेवा अधिक सक्षम करणे आणि सर्व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यावर भर देऊन पुढील वाटचाल करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600