महाराष्ट्र

एक रुपयात पीक विम्यासाठी आज शेवटची संधी

ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगाम २०२४ करीता शेतकरी नोंदणी करिता 15 जुलै अंतिम तारीख होती. यास आता 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. 28 जुलै 2024 अखेर ठाणे जिल्ह्यात 63,139, पालघर जिल्ह्यात 39,861, रायगड मध्ये 31,803, रत्नागिरी 10,563 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16,648 असे विभागात एकूण एक लाख 62,014 शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 51,760 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यात भात पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 50 हजार रुपये, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 20 हजार रुपये तर पालघर जिल्ह्यात उडीद पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 25 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पीकांचाच विमा उतरवता येतो. विविध जोखमींतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनातील अटी व शर्तींच्या अधीन राहून निश्चित केली जाईल. शेतकरी नोंदणीसाठी शेवटचा एक दिवस बाकी असून पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी 31 जुलै 2024 पर्यंत विमा उतरवावा, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600