जिल्हा

ठाण्यात पाऊस मुसळधार! आता थांबायचं न्हाय!

ठाण्यात पाऊस मुसळधार! आता थांबायचं न्हाय!
ठाण्यात पाऊस मुसळधार! आता थांबायचं न्हाय! फोटो: ठाणे वैभव

२४ तासांत पावसाचे द्विशतक; २१७ झाडांचा बळी!

ठाणे: मुसळधार पावसाने ठाणे शहरासह जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली असल्याने शहरी आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे शहरात सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या २४ तासांत २०० मि.मी. पावसाची नोंद झाली तर मंगळवारी सायंकाळी ७.३०पर्यंत ९३ मि.मी. पाऊस पडला. या पावसाने मासुंदा तलाव ओसंडून वाहू लागला तर उपवन तलावही काठोकाठ भरला. विशेष म्हणजे मुसळधार पावसाला सोसाट्याच्या वाऱ्याची साथ मिळाल्याने मागील ३६ तासांत तब्बल २१७ झाडे जमीनदोस्त झाली. यात एका नागरिक गंभीर जखमी झाला. हवामान विभागाने रविवार आणि सोमवारी ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार पावसाने त्याचे काम चोख बजावले. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३०पर्यंत शहरात तब्बल दोनशे मि.मी. पाऊस पडला. तर ११० झाडे उन्मळून पडली. आजही वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत आणखी १०७ झाडे कोसळली. विशेष म्हणजे ९०झाडे फक्त सहा तासांत पडल्याची माहिती मिळते. झाडाच्या फ़ांद्या पडण्याच्या घटना देखिल मोठ्या प्रमाणावर घडल्या. सोमवारी दुपारी १२. ३०च्या दरम्यान सेवा रस्त्यावर आरटीओ कार्यालय येथे रस्त्याने जात असताना भलेमोठे झाड पडून पांडुरंग भुवड हे जबर जखमी झाले. त्यांना तातडीने हजुरी येथिल जितो या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील पूर्व भागातील बारा बंगला, मुख्य बाजारपेठ, वंदना सिनेमा मुंब्रा, कळवा घोडबंदर या परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली होती. दिवसभरात संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. अनेक नाले दुथडी भरून वाहत होते तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील होर्डिंग आणि इमारतीच्या वर असलेले व्हेदर शेड तुटून पडल्याच्या घटना देखिल घडल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी ७.३०पर्यंत ९३.२३ मि.मी. पाऊस पडला होता. आतापर्यंत १२५०.४७. मि.मी. इतका पाऊस झाला असून मागिल वर्षी १०३३.४३ मि.मी. इतका पाऊस पडला होता. उद्या मंगळवारी देखिल पावसाचा ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाबरोबर सोसाट्याचा वारा देखिल वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस धोक्याचे असल्याने जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600