जिल्हा

गोपाळकालानिमित्त कासारवडवली भागात वाहतुकीत बदल

ठाणे: कासारवडवली वाहतुक उपविभागाच्या हद्दीत ७ सप्टेंबर २०२३ रोजी 'स्वामी प्रतिष्ठान’ तर्फे ‘गोपाळकाला’ निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १०.०० वा. या वेळेत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. उपवन, पवारनगरकडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना त्यागराज बिल्डींग कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने त्यागराज बिल्डींग कट येथे उजवे बाजूस वळण घेवून वसंतविहार स्कूल सर्कल, वसंतविहार सर्कल (बाबासाहेब आंबेडकर चौक) मार्गे तुळशीधाम मार्गाने इच्छितस्थळी जातील. वसंतविहार सर्कल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) कडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौक, पवारनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोकपुरम पब्लिक स्कूल कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वसंत विहार सर्कल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथून तुलशीधाम / वसंतविहार स्कूलमार्गे इच्छितस्थळी जातील. खेवरा सर्कलकडून हिरानंदानी मिडॉस-डॉ.काशिनाथ घाणेकर चौक/पवारनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवसेना शाखा क्र.०४ समोर खेवरा सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहने खेवरा सर्कल येथून दोस्ती इम्पीरिया बिल्डींगमार्गे सर्व्हिस रोडने तुळशीधाम वसंत विहार सर्कलमार्गे इच्छितस्थळी जातील. ही वाहतूक अधिसुचना ७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते रात्रौ १० वाजेपर्यंत लागू राहील. ही अधिसुचना पोलीस वाहने, रुग्णवाहीका फायर ब्रिगेड व अत्यावश्यक सेवेतील वाहने याना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600