जिल्हा

रानडे, पालवे यांच्यासह पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे आणि नगर प्रशासनातील मनोज रानडे यांचा समावेश आहे. पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे. तर मनोज रानडे संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शुभम गुप्ता, महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अंजली रमेश संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. झेनिथ चंद्र देवंथुला सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600